शुक्रवार, ५ मे, २०१७

माझा जिल्हा - माझी कविता

जळगावचा गोडवा.

................

तापी गिरणेच्या जोडीला

वाघूरची धार,

बहुळाचे पाणी देते

समृद्धी अपार,

सातपुड्याचा पर्वतात

आनंद भरपूर

माझ्या जळगाव जिल्ह्याची

परंपरा अपरंपार

कानबाईची गाणी , 

मनी बोले अहिराणी

भुलविते मनाला, मुक्ताई,

बहिणाईची गाणी

भास्कराचार्याने शुन्य 

पाटणा परिसरी शोधला

केकी मुस यांच्या चित्रकला 

पाहुनी  भुरळ पडली जगाला

केळी , पेरु संगे बोरं मेहरुण

उमवि आहे आमची ज्ञानखाण

फैजपूरची नोंद इतिहास घेतो

साहित्य अकादमीने सन्मानित होतो.

नाट्य संस्कृती चित्र , उद्योग

कृषी विकासाचे ध्यान

कोसलाचा पांडुरंग आहे 

वाचकांची शान.

उनपदेवचा गरम झरा,

पालचा गारवा 

रोज मनामनात गातो

जळगावचा गोडवा.

वानांची कविता जगात जाते

शिवाजींची ढफावर थाप

पर्यावरणाचा मंत्र देते .

भादवा संगे ,

इथे  लेखणीने भोंगऱ्या,बहरतो

'पाडा ' चा चांगदेव सांगतो

शेतकऱ्याची  व्यथा 

गर्दी जमते पहाण्या ,

बहाळच्या रथा, 

बालकवी, केशवसूत यांची लेखणी,

भुईकोट किल्याची ओळख

सांगते झाशीची राणी 

पारोळ्याची एक कहाणी

क्रांतीकारकांना वंदन करतो

विचारांचा सन्मान करतो

शितल, स्वीटीच्या रुपाने

अंतराळात झेप घेतो

प्रतिभाताईच्या रुपाने 

' राष्ट्रपती ' सुद्धा होतो,

' मन्हा गावले ' काव्यसंग्रह,

 बनतो आमचा भाषिक ठेवा

१५ तालुक्यांचा जळगाव जिल्हा

फिरुन पहावा ,समजून घ्यावा.

.........

रचना - एकनाथ गोफणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपलं मत

माझी लेखणी

गोरबोली भाषा .. कविता.

 अहिराणी -लावणी . जाऊ नका बाहेर .= आभाय आज ,भरी वूनं  गरजी ऱ्हायनं भारी......... चमकी ऱ्हायन्या इजा आज     जीव मना  गया  घाबरी... बरसी ऱ्हाय...