- ***सेवालाल*****
.............................................................क्रांती करण्यासाठी
समाजबांधवांसह
देश पालथा घातला
वंदनीय आम्हाला
तुम्ही सेवालाल .....
समाज एकतेसाठी
वैश्विक कृतीशिल धोरण
मानवता वादाचे पुरस्कर्ते
समाज करतो तुम्हा स्मरण .
सामाजिक घातक रुढींवर
केले 'भाया' प्रहार
तत्कालीन दांभिकांना
आणले कृतीने चव्हाट्यावर.
सेवालाल नावात 'सेवा' भरली
वाखाणण्या सारखी किर्ती उरली
लाजाळुपणा सोडण्याची हिंमत दिली
लक्षावर नजर ही दृष्टि मिळाली.
तरीही वैज्ञानिक दृष्टिचा अभाव
आज तांड्यातांड्यात आहे
तुमच्या सेवा विचारांचा
'लाल'घडेल कधी
याचीच भाया मी
'वाट' पाहत आहे .
याचीच भाया मी
'वाट' पाहत आहे .
**********************
एकनाथ लक्ष्मण गोफणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपलं मत