रविवार, ३० डिसेंबर, २०१८

सुनसगाव बु॥ जपतयं ग्रामीण नाटय परंपरेच्या पाऊलखुणा



लेख-------------सुनसगाव बु॥ जपतयं ग्रामीण नाटय परंपरेच्या पाऊलखुणा

      जळगाव जिल्हयातील वाघूर व कांग या मुख्य नद्यांचा स्पर्श लाभल्याने समृद्ध झालेला जामनेर तालुका, आपलं वेगळपण जपत राजकिय, सामाजिक , शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटवित आहे. जामनेर भागात बोलली जाणारी 'तावडी ' ही बोली आपल्या शब्दसैनिकांच्या लेखणीने बहरत आहे.
     जामनेर तालुक्यातील विविध गावांनी आपापल्या क्षेत्रात आपलं वेगळपण जपलं आहे. या गावांपैकी एक असलेलं व जामनेर शहरापासून २१ कि.मी पश्चिमेस असलेलं सुनसगाव बु॥ हे गाव सुद्धा  आपलं ग्रामीण नाटय परंपरेच्या पाऊलखुणा आठवणीच्या रुपात जपत आहे...
       १५ ऑगस्ट रोजी , गावात शाळेतल्या मुलांसोबत प्रभातफेरीत फिरत असतांना मला श्रीराम प्रासादिक नाटय मंडळाचं खुले नाटयगृह दृष्टीस पडलं.
      स्वतः नाट्यकलावंत असल्याने मला आनंद वाटला,माझी उत्सुकता ताणली गेली. या गावाने जोपासलेल्या नाटय परंपरेची माहिती मिळविण्यासाठी मी गावातील विविध व्यक्तींशी संवाद साधू लागलो. या शोधातून माझी सुनसगाव बु॥ येथिल शिवप्रसाद महाजन या वाचक _रसिक व्यक्तीमत्वाशी ओळख झाली. त्यांच्या माध्यमातून विविध नाटकाच्या विविध आठवणी कलावंतांनी सांगीतल्या . ग्रामीण नाटय परंपरेच्या पाऊलखुणा आठवणीच्या रुपात जपत असलेल्या सुनसगाव बु॥ ची नाटयकला या लेखाद्वारे उपलब्ध माहितीवरुन वाचकांना करुन देत आहे.
  प्राप्त माहिती नुसार१९३९ मध्ये येथिल कलावंत ग्रामीण नाटय परंपरा जोपासत होते. काही काळाच्या विश्रांती नंतर ,
  १९८०-  च्या दशकात नवीन प्रारंभ
मन्साराम भामेरे, त्र्यंबक पाटील ,पंडीत भामेरे ,हरलाल भामेरे ,नथूलाल काबरा,रामदास पाटील ,सीताराम भामरे आदिंनी केल्याचे जाणकारांनी सांगितले.रमेश महाजन ,मधूकर महाजन ,काशिनाथ मोघे,रमेश कुलकणर्णी
पंडीत महाजन,सिताराम भामेरे,प्रदिप पांडूरंग महाजन,भाऊसाहेब थाटे
राजेश महाजन, रघुनाथ मांडे, अशोक मोघे , भाऊसाहेब थाटे, अशोक सोनवणे
समाधाऩ शिंदे , अनिल सोनवणे, सीताराम वाणी  या मंडळींनी आपलं अंगिक व वाचीक अभिनय दाखवत रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्या वेळीगणेश वाणी ,मोहन भोजणे हे   स्त्री पात्राची भूमिका वठवायचे.हरलाल भामेरे हे पेटीमास्तर ,तर तोताराम महाजन हे वेशभूषा कौशल्यपूर्ण पद्धतीने करायचे..
नाटकाच्या निर्मितीची जबाबदारी मन्साराम भामेरे हे सांभाळायचे..
नाना सोनार यांचे सह समाधान पाटील - तबला वादन करायचे.
      श्रीराम प्रासादिक नाटय मंडळाच्या कालावंतांनी आपल्यातील प्रचंड ऊर्मीने त्या काळात डाकू मानसिंग, राजा हरिश्चंद्र, संत सखुबाई, भक्त पुंडलिक, पोटचा गोळा, हॅलो , मी चेअरमन बोलतोय ,
एखादया चं नशिब.  लग्नाआधी वरात,माझी जमीन ,रक्ताची तहान
आदि नाटकांचे यशस्वी प्रयोग केले.
                        सुनसगाव सह ,सामरोद ,सोनाळा, परधाडे, या गावांसह पिंपगाव  हरेश्वर ता. पाचोरा येथे शाळा वर्धापन निमिता ६ कलावंतांनी आपली नाटयकला सादर केल्याचे वयोवृद्ध कलावंत दौलत केशव फिरके यांनी सांगितले.

दौलत केशव फिरके यांनी 'डाकू मानसिंग ' नाटकात  डाकू चे वडील - कुशाबा सरनाईक ही भूमिका केल्याची आठवण सांगीतली. नाटक बघायला त्या काळी पंचक्रोशीतील नाटयरसिक बैलगाडीवर सुनसगावला रामनवमीच्या काळात यायचे, व नाटयाचा आनंद घ्यायचे असं येथिल रसिक सांगतात..       श्रीराम प्रासादिक नाटय मंडळाच्या कालावंतांनी रसिकांना आनंद देणे, नाटयकलेच्या माध्यमातून पौराणिक कथा दर्शन, सामाजिक प्रबोधन करण्याबरोबर सामाजिक भान जपत आपल्या  संवेदनशीलतेचे दर्शन घडविले.  नेरी जवळील हिंगणे बु ॥ _ येथे सादर केलेल्या नाटकाच्या जमा झालेल्या निधीतून    दि. २६ ऑक्टोबर १९९३ किल्लारी भूकंपग्रस्तांना मदत निधी ८०१ / - रुपये रोख दिल्याची आठवण येथिल कलावंतांनी सांगीतली..

   नाटकातील खंडेराव तलाठी, डाकू मानसिंग , तसेच संत सखुबाई नाटकात स्त्री पात्र डबलरोल मध्ये साकारणारे रामदास पाटील रसिकांच्या मनात अजरामर आहेत..
चित्रपट कलावंत रमेश देव यांचे सोबत काम केल्याचा अनुभव
सुनसगाव बु ॥ येथिल श्रीराम प्रासादिक नाटय मंडळाच्या कलावंतांनी केबी ड्रीप च्या माहिती पटात चित्रपट कलावंत रमेश देव यांचे सोबत काम केल्याचा अनुभव सांगितला. अशोक मोघे,मधूकर महाजन,राजू पवार ,राजू महाजन , दौलत फिरके आदींनी या माहितीपटात काम केल्याचे सांगीतले...
       काळाच्या पडद्याआड काही कलावंत गेले. काही कलावंत रोजगार शोधत आपली उपजिविका करीत आहेत. रसिकांच्या मनात त्यांच्या भूमिका कायम आहेत.. राजकारणात रंगली ग्रामपंचायत हे शरद वाघमोडे यांनी लिहिलेल्या नाटकात धनाजी ही भूमिका करणारे दौलत फिरके यांचा २५ फेब्रु. २००६ रोजी सोयगाव येथिल आई ग्रामिण बहुउद्देशिय प्रतिष्ठान ने सन्मान केला. तो इतर कलावंतांना प्रेरणा देणारा ठरला.
 दि. ३० डिसेंबर २०१८ रोजी जामनेर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि  संस्कृती मंडळ ,मुबई आणि जामनेर तालुका साहित्य संस्कृती मंडळ,जामनेर यांचे सयुक्त विद्यमाने जामनेर येथे ३० डिसेंबर २०१८रोजी पहिले राज्यस्तरीय तावडी बोली मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले. त्यात जामनेर तालुका साहित्य संस्कृती मंडळाचे वतीने  -रमेश महाजन यांना नाट्यकले बद्दल तावडी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा येथील नाटय परंपरेचा सन्मान आहे..
    सुनसगाव बु॥ हे गाव आणि तेथिल विस्तिर्ण वडाच्या छायेत असलेलं सुंदर खुले नाट्यगृह आपल्या ग्रामीण नाटय परंपरेच्या पाऊलखुणा आठवणीच्या रुपात जपत आहे.या नाट्यगृहाला अजून ओढ आहे,कलावंतांची.
समोर बसणाऱ्या नाट्यरसिकांची...पुन्हा ही नाट्यचळवळ बहरावी, यासाठी नवनिर्मिती व्हावी कलावंतांना चैतन्य मिळावे यासाठी प्रयत्नांची गरज आहे.
 ही ग्रामीण नाट्यपरंपरा जोपासण्यासाठी धडपडणाऱ्या सर्व कलावंतांना हार्दिक शुभेच्छा.. !

लेखक .. एकनाथ लक्ष्मण गोफणे






स्त्री _ पात्र भूमिका पुरुष मंडळी आनंदाने करायचे.


कलावंतांचा सन्मान - प्रेरणा देणारा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपलं मत

माझी लेखणी

गोरबोली भाषा .. कविता.

 अहिराणी -लावणी . जाऊ नका बाहेर .= आभाय आज ,भरी वूनं  गरजी ऱ्हायनं भारी......... चमकी ऱ्हायन्या इजा आज     जीव मना  गया  घाबरी... बरसी ऱ्हाय...