रविवार, १६ डिसेंबर, २०१८

सेवाभायाची वात



*सेवाभायाची वात*
बंजारा तरुण मित्रा
वेगवेगळी प्रलोभनं दाखवून
ते करतील तुझा घात
यासाठी मनात ठेव कायम
तुझ्या सेवाभायाची वात..........
जातीय भावनेत गुंतवून
तुझी योजनाबद्ध शिकार करण्याची
ते करताय तयारी...
भूतकाळ आठवून बघ,
त्यांनी चांगलं काहीच केलं नाही
तुझ्या तांड्यासाठी .....................
वर्तमानात तुझी शक्ती पाहून
त्यांना शक्ती प्रदर्शन करावसं वाटतयं.
तुझ्या श्रमावर   झेंडा फडकविण्यासाठी
ते  सज्ज झालेत
तू सावध रहा   .....
यासाठी मनात ठेव कायम
तुझ्या सेवाभायाची वात..........
©®✍
Eknath Laxman Gofane ekgof2015@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपलं मत

माझी लेखणी

गोरबोली भाषा .. कविता.

 अहिराणी -लावणी . जाऊ नका बाहेर .= आभाय आज ,भरी वूनं  गरजी ऱ्हायनं भारी......... चमकी ऱ्हायन्या इजा आज     जीव मना  गया  घाबरी... बरसी ऱ्हाय...